महाराष्ट्रात आढळले Omicron चे 8 रुग्ण, महाराष्ट्रात वाढला धोका

0

मुंबई,दि.14: ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये (omicron patients mumbai ) ओमिक्रॉनचे 8 नवीन रुग्ण आढळून आले आहे. विरारमध्ये एक रुग्ण आढळला आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्यात आता 28 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा (corona) नवी व्हेरिएंट ओमिक्रॉनचे (omicron) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राज्य आरोग्य विभागाने कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. राज्यात आता 8 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 8 पैकी 7 रुग्ण मुंबईतील आहे तर 1 विरारचा रुग्ण आहे. आठपैकी एकही रुग्णाला तीव्र लक्षणे नाहीत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. राज्यातील ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे.

नवीन आढळलेल्या ८ रुग्णांपैकी २ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ६ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यापैकी ७ रुग्णांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. तर एका रुग्णाने लस घेतली नव्हती.

मुंबई एकूण रुग्णांची संख्या 12 झाली आहे. तर त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये 10 तर पुण्यात 2 रुग्ण आढळले आहे. कल्याण डोंबिवली, नागपूर, लातूर आणि वसई विरारमध्ये 1 रुग्ण आढळला आहे.आतापर्यंत 9 रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली असता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here