मुंबई,दि.21: Omicron Cases In Maharashtra: ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्णसंख्या भारतात (India) वाढत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) पेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात आहे. भारतात ओमिक्रॉनची प्रकरणे (Omicron Cases) झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढत आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना काही निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण (Union Ministry of Health) यांनी राज्य सरकारांना एक पत्र लिहून इशारा दिला आहे आणि महत्वाची माहीती देखील सांगितली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ओमिक्रॉन डेल्टापेक्षा तीनपट जास्त संसर्गजन्य आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी राज्यांना चाचण्या वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे. भारतात आतापर्यंत जवळपास 216 ओमिक्रॉनचे रूग्ण सापडले आहेत. मंगळवारी महाराष्ट्र, ओडिशा आणि जम्मू-काश्मीरमध्ये ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉनच्या सर्वाधिक केस आहेत.
केंद्र सरकारने केल्या या सूचना
- आरोग्य सचिव म्हणाले की, स्थानिक आणि जिल्हास्तरावर त्वरित निर्णय आणि कठोर कारवाईची गरज आहे. हे केल्याने ओमिक्रॉनचा संसर्ग कमी होऊ शकतो.
- पुढे बोलताना आरोग्य सचिव म्हणाले की, ज्या जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तेथे टेस्टिंग वाढवणे खूप आवश्यक आहे.
- ज्या जिल्हांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. तिथे रुग्णालयांमध्ये कोविड-19 शी संबंधित सर्व उपलब्ध सुविधांची खात्री करण्यात यावी.
- कठोर प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा आणि गरजेनुसार स्थानिक पातळीवर रात्री कर्फ्यू सारखे निर्बंध देखील लावा. याशिवाय मोठ्या मेळाव्यावर बंदी आणा आणि लग्नासारख्या समारंभात लोकांची संख्या कमी करा.
- सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि अधिसूचित आयसोलेशन झोन यांचाही लवकरात-लवकर आढावा घ्या.
- सर्व पॉझिटिव्ह लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अनिवार्य आहेच.
- डेल्टा केस अजूनही देशाच्या विविध भागांमध्ये आहेत. देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा जबाबदार असल्याचे मानले जात होते.
- यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व राज्यांना लसीकरण वाढवून 100% लसीकरण कव्हरेजचे लक्ष्य पूर्ण करण्यास सांगितले आहे.