सोलापूर,दि.15: सोलापूर शहरात 5जी नेटवर्क (5G In Solapur) सुरू झाले आहे. जिओची 5जी (Jio 5G In Solapur) सेवा सोलापुरात सुरू झाली आहे. ट्रायलबेसवर सध्या मोबाईल ग्राहकांना मोफत सुविधा मिळत आहे. ज्या मोबाईल ग्राहकांकडे 5जी सपोर्ट करणारे मोबाईल (5G Support Handset) आहे, त्या मोबाईल ग्राहकांना 5जी सुविधा मिळत आहे. विवो (Vivo), सॅमसंग (Samsung), iPhone कंपन्यांनी अपडेट दिले आहे. मोबाईल ग्राहकांना सॉफ्टवेअर अपडेट करावे लागणार आहे.
जिओ ग्राहक 5जी सेवेचा लाभ घेऊ शकणार | 5G In Solapur
सोलापुरातील जिओ ग्राहक 5जी सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. सध्या कंपनी विनाअतिरिक्त शुल्क (रिचार्ज) ही सेवा देत आहे. सोलापूर शहरातील सोलापुरातील एक लाख 80 हजारापेक्षा जास्त मोबाइलधारक 5जी नेटवर्कशी कनेक्ट झाले आहेत. फिफ्थ जनरेशन अर्थात 5जी नेटवर्क सोलापुरात सुरू झाले असून मुंबई, पुणे तसेच नागपूरनंतर 5जी नेटवर्क सुरू होणारा सोलापूर महाराष्ट्रातील चौथा जिल्हा ठरला आहे.
सोलापुरात चांगला प्रतिसाद | Jio 5G In Solapur
मुंबईपेक्षा सोलापुरात नेटवर्कची स्पीड क्षमता काही प्रमाणात कमी असली तरी यास खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या कंपनी अजून यावर काम करत आहे. जुळे सोलापूरात बॉम्बे पार्क, विष्णुपुरी, रुबी नगर, गणेश बिल्डर, अमोल नगर आदी भागात 511एमबीपीएस स्पीड मिळत आहे.

सोलापूर आकाशवाणी परिसर, नीलम नगर, 70 फूट आदी भागात 300 एमबीपीएस स्पीड मिळत आहे. सात रस्ता येथे 439 एमबीपीएस स्पीड मिळत आहे. यात नंतर सुधारणा होऊन स्पीड आणखी वाढणार आहे. सध्या जिओच ही सुविधा देत असली तरी एअरटेलचेही (Airtel) काम सुरू आहे. एअरटेलही लवकरच 5जी सुरू करणार आहे.

5जी नेटवर्क कनेक्ट होत आहे
ज्यांच्याकडे 5जी मोबाइल आहे, त्यांच्या मोबाइलवर 5जी नेटवर्क कनेक्ट होत आहे. त्यांना एसएमएस देखील जात आहे. मोबाइलच्या सेटिंगवर जाऊन 5 जी नेटवर्क ऑन केल्यास 5जी नेटवर्क कनेक्ट होत आहे. सोलापुरात 5जी नेटवर्क सुरु झाल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर नवीन 5जी मोबाईल हँडसेट घेण्याकडे सोलापूरकरांचा कल वाढत चालला आहे.