वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

0

सोलापूर,दि.27: गांधीनगर गुजरात येथे 26 ऑगस्ट रोगी स्मार्ट इंडिया हॅकथन ( Smart India hack thon ) ही स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेमध्ये भारतातील 350 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत सोलापुरातील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी भाग घेऊन Teck Army नावाचे. प्रोजेक्ट सादर केले होते. या प्रोजेक्टद्वारे धारणातून सोडले जाणारे अतिरिक्त पाणी, पूर आल्यानंतर मोबाईलद्वारे नदीकाठच्या जनतेस वेळीच सतर्क करणे, पूरपरिस्थितिची परिपूर्ण माहीती देणे, यावर आधारीत हे प्रोजेक्ट होते.

या प्रोजेक्टला प्रथम क्रमांकासहित 1,00,000 / रूपयाचे बक्षीस मिळाले आहे. सोलापुच्या शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र या टीमचे कौतुक होत आहे.

या टीममध्ये स्वाती कुलकर्णी, मधुरा सरसंबी, श्रावणी नोरा , दुर्गेश कुडाळकर, वरुण लोहाडे आकांक्षी जोशी सहभागी होते. तर प्राध्यापक सतीशकुमार काशीद आणि प्राध्यापक संप्रीत पटेल यांनी मार्गदर्शन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here